पंजाबमध्ये १५ कोटींचे अमली पदार्थ जप्‍त   

१०१ जणांना अटक

चंडीगढ : पंजाबमध्ये अमली पदार्थ जप्‍त करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. त्या अंतर्गत १०१ किलो अमली पदार्थ जप्‍त केले असून त्यांची आंतरराष्ट्रीय किंमत १५ कोटी रुपये आहे. राज्यात नशेविरोधात युद्ध मोहीम राबविण्यात आली आहे. त्या अंतर्गत ८२ व्या दिवशी कारवाई करुन अमली पदार्थांचा मोठा साठा जप्‍त केला. 
 
यामध्ये १५ किलो हेरॉईन, १०१ किलो गांजा आणि २५ लाख ५२ हजार रुपये रोख जप्‍त केले. आतापर्यत १२ हजार ६५० जणांना अटक केली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांत पोलिस महासंचालक गौरव यादव यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू आहे.१ हजार ३०० पोलिस कर्मचार्‍यांच्या २०० पथकांनी कारवाईत भाग घेतला असून ४६० ठिकाणी छापे घातले आहेत. गुरुवारी ७९ गुन्हे दाखल केले. दिवसभरातील कारवाईत ४९७ संशयितांना ताब्यात घेतले.मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलिस आयुक्‍त, उपायुक्‍त आणि ज्येष्ठ अधिकार्‍यांना राज्य अमली पदार्थ मुक्‍त करण्याचे आवाहन केले आहे. कारवाई प्रभावीपणे व्हावी, यासाठी अर्थमंत्री हरपाल सिंग चिमा यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

Related Articles